अहमदनगर : अहमदनगर जिल्हा न्यायालयात अधीक्षक पदावर कार्यरत असलेले भाऊराव वाईकर यांची अहमदनगर येथील कौटुंबिक न्यायालयात प्रबंधक (रजिस्ट्रार) या पदावर जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचे आदेशानुसार पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक न्यायालयातील प्रबंधक हे पद रिक्तच होते. यासंदर्भात कौटुंबिक न्यायालय वकील संघ अहमदनगरच्या पदाधिकारी यांनी यापुर्वीच प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्लगड्डा साहेब यांची भेट घेतली होती आणि फॅमिली कोर्टला प्रबंधक आणि दोन बेलीफ द्यावेत, अशी विनंती केली होती. त्यामुळे प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री सुधाकर यार्लगड्डा साहेब आणि कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. वाईकर हे अतिशय कार्यक्षमतेने कामकाज सांभाळणारे आहेत. जिल्हा न्यायालयात सुद्धा त्यांनी अगदी ज्युनियर क्लार्कपासुन ते अधिक्षक पदापर्यंत पदोन्नतीने आले होते. नवीन प्रबंधक म्हणून कौटुंबिक न्यायालयात आपला कार्यभार घेतल्यानंतर कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड शिवाजी अण्णा कराळे, उपाध्यक्ष ॲड लक्ष्मणराव कचरे, कार्याध्यक्ष ॲड सुरेश लगड, सचिव ॲड अनिताताई दिघे, सह सचिव ॲड अर्चनाताई शेलोत खजिनदार ॲड राजेश कावरे, सदस्य ॲड एम बी अंबेकर, ॲड राजाभाऊ शिर्के ॲड शिवाजी सांगळे, ॲड अनुराधाताई येवले, ॲड सुचिताताई बाबर , ॲड करूणा शिंदे मॅडम, ॲड सत्यजीत कराळे, कौटुंबिक न्यायालयाचे अधिक्षक जी. डी. जोशी साहेब आणि सर्व कर्मचारी वर्ग हे सर्व उपस्थित होते.