Just another WordPress site

Bawankuke Meets Raj Thackrey : फडणवीस, बावनकुळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, या भेटीमागचं ‘राज’काय? भाजप-मनसेची युती होणार का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं. राज्यात  शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यापासून राज ठाकरे आणि भाजपचे संबंध आणखी चांगले झाल्याचं चित्र आहे. ठाकरे – फडणवीस भेटीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंची भेट घतेली. दरम्यान, भाजपला राज ठाकरे का महत्वाचे आहेत? भाजप आणि मनसेची युती खरंच शक्य आहे का? तस झाल्यास याचा फायदा कोणाला होईल? याच विषयी जाणून घेऊ.



महत्वाच्या बाबी 

१. राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाली अशी चर्चा 

२. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही घेतली राज ठाकरेंची भेट

३. भाजपसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे महत्वाचे आहेत 

४. भाजपसोबत वाटचाल करणं मनसेच्या हिताचं ठरेल का? 

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली अशी चर्चा आहे. हे दोघे भेट नाकारत असले तरीही ही भेट झाल्याचं म्हटलं जातं आहे. दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यातही भेट झाली.  या भेटीगाठी वाढणं. त्यांच्या चर्चा होणं हे दोन पक्ष एकमेकांच्या जवळ येत असल्याचे संकेत आहेत.राज यांची आजवरची सध्याची भूमिका ही भाजपशी संलग्न असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. दुसरं म्हणजे, हिंदुत्वासाठी राज्यात ठाकरे बँड गरजेचा आहे, हे भाजपच्या लक्षात आलं. त्यामुळं फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचं बोलल्या जातं.राज ठाकरे आणि भाजप जवळ येण्यामागचा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे, आगामी पालिका निवडणुका. कारण, ग्रामीण राजकारणापेक्षा शहरी राजकारणात मनसेचा आणि राज ठाकरेंचा बोलबाला हा कायम राहिलाय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका पाहता राज ठाकरे यांच्याशी असलेली जवळीक भाजपसाठी निवडणुका आणखी सोप्या करू शकते. सध्या मुंबईत शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत एक शिंदे गट आणि दुसरा ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. ठाकरे आणि मुंबई हे समीकरण खूप जुनं आहे. ते सहजासहजी मोडायचं असेल तर आणखी एक ठाकरेच पर्याय म्हणून दिले तर भाजपला त्याचा फायदा निश्चितपणे होऊ शकतो.  त्यामुळं मुंबई जिंकायची असेल तर राज ठाकरेंना सोबत घेणं भाजपला अपरिहार्य असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. दरम्यान, राज ठाकरे हे शिवसेनेत झालेल्या बंडाचा फायदा घेणार यात काहीही शंकाच नाही. त्यांचा अजेंडा हेच सांगतो आहे. महाराष्ट्रात राजकीय बंड होण्याच्या दोन महिने आधीपासून राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा नारा दिला. मशिदींवरच्या भोंग्याच्या प्रश्न समोर आणला. तसंच त्यावर आपण मार्ग काढू शकतो हे देखील दाखवून दिलं. तसंच वारसा विचारांचा असतो आणि तोच वारसा आपण पुढे नेत आहोत हे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना आपण पर्याय असू शकतो हे देखील सांगितलं. त्यामुळे भाजप नेते राज ठाकरेंशी जवळीक वाढवत असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.मात्र, मनसेची अवस्था कशी आहे ते अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळं मनसेला नवसंजीवनी मिळायची असेल तर त्यांना चांगल्या मित्राची आवश्यकता आहेच. शत्रूचा शत्रू तो मित्र या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरेंचा शत्रू भाजप झाला.  त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत जाण्यापेक्षा भाजपसोबत जाऊन युती करणं हे कायमच मनसेच्या फायद्याचं ठरणार आहे. याशिवाय उद्धव ठाकरे टाळी देण्याच्या नावाखाली कसा दगा करतात याची चांगली जाणीव राज ठाकरेंना आहे. त्यामुळे तूर्तास तरी भाजपसोबत वाटचाल करणं हे राज ठाकरेंच्या आणि पर्यायाने मनसेच्या हिताचं ठरणार आहे. दरम्यान, या दोन पक्षांची युती होणार की नाही हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!