Just another WordPress site

Badlapur Rape Case : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ ‘एआयएसएफ’ची निदर्शने, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, भारतीय महिला फेडरेशनच्या शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग

अमरावती : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur Rape Case) येथील एका खासगी शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्या प्रकरणाच्या निषेधार्थ शनिवारी येथील इर्विन चौकात ‘एआयएसएफ’ची निदर्शने  (AISF Amravati) करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच महाराष्ट्र गुन्हेगारीमुक्त झाला पाहिजे, बलात्कारासारखे गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी आंदोलकांनी केली.

Police Bharti : पोलिस दलात मोठी संधी! डिसेंबर महिन्यात पुन्हा भरती, राज्यात 7500 तर मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदं 

या आंदोलनात ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, भारतीय महिला फेडरेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थी महिला, युवक यांनी जोरदार निदर्शने जोरदार घोषणाबाजी करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.  घटनेतील आरोपी जेव्हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता निघतो, तेव्हा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवी हे सुद्धा मौन बाळगतात. ते केवळ सामाजिक सुरक्षेच्या आणि राजकीय नैतिकतेच्या मोठ्या मोठ्या बाता करतात. पण नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्रीपदाचा विना विलंब राजीनामा दिला नाही. नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा, अशी जाहीर मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व भारतीय महिला फेडरेशनने केली आहे.

बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. बदलापूरच्या घटनेत पोलीसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या आईला तासनसात पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. पोलीस यंत्रणेवर संशय निर्माण झाला. अत्याचाऱ्याला कठोर शिक्षा देण्यात यावी, त्याशिवाय अत्याचाराला मदत करणारे कर्मचारी, तक्रार नोंदवण्यास उशीर करणारे पोलीस प्रशासन, शालेय प्रशासन, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सर्वांवर विना विलंब कार्यवाही करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

बदलापुरातील लैंगिक अत्याचाराची घटना चीड  आणणारी आणि मानवी संवेदना बोथट करणारी आहे. बदलापूरसह देशात विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेवर आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही जेव्हा महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या येत नाहीत. सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी.
-प्रतीक्षा ढोके

या आंदोलनाचे नेतृत्व एआयएसएफ राज्य उपाध्यक्ष धीरज बनकर, जिल्हा सचिव प्रतीक्षा ढोके, वेदिका मरगडे, जिल्हा अध्यक्ष चैतन्य कलाने, महिला फेडरेशनच्या जिल्हा सचिव चित्रा वंजारी यांनी केले. डॉ. रंजना इंगोले, प्रा. विराज मोहिते यांनी विशेष सहकार्य केले. या आंदोलनाला राज्य किसान सभेचे सचिव कॉम्रेड अशोक सोनारकर यांनी समर्थन दिले.

पेमेंट अॅपसाठी सोपा ‘पासवर्ड’ धोकादायक, नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरचा इशारा; स्ट्राँग पासवर्ड कसा बनवावा? 

रोशन शेंडे, निहिरा ससाने, होलिका कारले, गौरी मातकर, रिद्धी गजभिये, मनीषा कैथवास, चैताली सोळंके, समीक्षा मारने, सारिका जामुनकर,कविता ठाकरे, शिवानी मुसुम, गौरव मसराम, वैभव घुले, गौरव राऊत, वेदांत कोल्हे, सतीश पठाडे, जितेश खोटे, अथर्व चर्जन, पायल कस्तुरे, सृष्टी हिवराळे, संजना खाकसे, सोनू खाकसे, वैष्णवी खडसे, मीनाक्षी भिलावेकर, प्रांजली जोगे, दीक्षा भागवत, मनीषा कैथवास, रोशन शेंडे, संजीवनी चव्हाण, समीक्षा मारवे, अरबाज खान, श्रेया मकेश्वर, वैष्णवी इंगळे, सायली दरेकर, एकता डोंगरे, सृष्टी इंगळे, लक्ष्मी भोसले, प्रांजली जोगे, मोहम्मद जावेद, यशवर्धन भगत, यश चोखंडे, साहिल कांबळे, निक्षय पठारे, सोनाली वैद्य, दीक्षिता तळेकर, कविता मंदुरकर, मीना वैद्य, सोनाली साखरवाडे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाली होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!