Just another WordPress site

अमरिंदर सिंग यांचा भाजपमध्ये प्रवेश, लवकरच मिळणार महाराष्ट्राचं राज्यपाल पद?

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि किरण रिजीजू यांच्या उपस्थित भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. तसंच सिंग यांनी त्यांचा पंजाब लोक कॉंग्रेस पक्ष देखील भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे आता भाजपला कॅप्टन यांच्या रूपाने पंजाबमध्ये समाजमान्य चेहरा मिळाला. दरम्यान, ते महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

 

महत्वाच्या बाबी

१. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
२. पंजाब लोक काँग्रेस पक्षही केला भाजपमध्ये विलीन
३. BJP ला कॅप्टन यांच्या रूपाने मिळाला समाजमान्य चेहरा
४. अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याची शक्यता

 

मार्च महिन्यात झालेल्या पंजाब विधानसभा निवडणूकीतील पराभवामुळे कॉंगेसची अवस्था ही व्हेंटिलेटरवर असलेल्या पेशंटसारखी झाली. पंजाब हा एकेकाळचा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. मात्र, पंजाबमध्ये काँग्रेस संपण्याच्या मार्गावर असतानाही काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वानेही याकडे गांभीर्याने पाहिलं नाही. राहूल गांधींनीही गट-तट मिटविण्याऐवजी ठराविक गटाला झुकते माप दिले. त्यामुळे काँग्रेसपासून अमरिंदर सिंग सारखे प्रामाणिक, निष्ठावान नेते या दुफळीमुळे ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ म्हणत दुरावत गेले. परिणामी काँग्रेस पूर्णत: कोमातच पोहोचल्याचं चित्र आहे.
अमरिंदर सिंह यांनी जवळपास नऊ वर्षे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं. गेल्या वर्षी त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करून काँग्रेसचा राजीनामा दिला आणि आपला नवा पक्ष पीएलसी स्थापन केला. पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन यांनी भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली होती. मात्र युतीला निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नाही. खुद्द अमरिंदर सिंह यांनाही त्यांची जागा वाचवता आली नाही. दरम्यान आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करून कमळ होती घेतले. त्यांच्या या प्रवेशासह पंजाब लोक काँग्रेसदेखील भाजपमध्ये विलीन झाली. त्यामुळं अमरिंदर सिंग यांनी भाजपात प्रवेश केल्यानं भाजपची ताकद आणखी वाढली जाण्याची शक्यता आहे. अमरिंदर यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारीही भाजपमध्ये दाखल झाल्याने आता पंजाबच्या राजकारणाला वेगळे वळण मिळू शकते, असं राजकीय जाणकार सांगतात. भाजपला कॅप्टन यांच्या रूपाने पंजाबमध्ये नवा चेहरा मिळाला. त्याचा आगामी लोकसभेत भाजपला भाजपला होऊ शकतो. तीन कृषी कायद्याने पंजाबमध्ये पक्षाचे मोठे नुकसान झाले. ते भरून काढण्याची जबाबदारी कॅप्टन यांच्यावर भाजपने दिली. त्यामुळं त्यांच्या या प्रवेशामुळे पंजाबच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळं गेली अनेक वर्षे काँग्रेसचा किल्ला असलेल्या पंजाबमध्ये भाजप वर्चस्व करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!