Just another WordPress site

डेव्हिस चषकासाठी अल्कराझ स्पेनमध्ये दाखल

माद्रिद : अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर अव्वल मानांकित कार्लोस अल्कराझ डेव्हिस चषक लढत खेळण्यासाठी स्पेनमध्ये दाखल झाला आहे. मात्र, त्याच्या सहभागाविषयी अजून संदिग्धताच बाळगली जात आहे.
‘‘जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानासह मायदेशात पाऊल ठेवताना मला अभिमान वाटत आहे. डेव्हिस चषक लढतीत खेळणे माझ्यासाठी नेहमीच विशेष असते. हे वातावरण वेगळेच असते आणि मी स्पेनसाठी खेळण्यास उत्सुक आहे,’’ असे अल्काराझ म्हणाला.
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर स्पेनचा १९ वर्षीय कार्लोस अल्कराझ पुरुषांच्या टेनिस क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचला आहे. अल्कराझने चौथ्या स्थानावरून अग्रस्थानी झेप घेतली. नॉर्वेच्या रूडने हंगामातील ग्रँडस्लॅम स्पर्धाचा दुसरा अंतिम सामना खेळताना सातव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी मजल मारली. नदालला अग्रस्थानी पोहोचण्याची संधी होती, मात्र चौथ्या फेरीत फ्रान्सिस टिआफोकडून पराभूत झाल्याने तो तिसऱ्या स्थानी राहिला. डॅनिल मेदवेदेवची चौथ्या स्थानी घसरण झाली असून दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी न झालेला अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्हही दुसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचला आहे. हंगामातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेला मुकणारा नोव्हाक जोकोव्हिच एका स्थानाच्या घसरणीसह सातव्या स्थानी आहे.  इगा श्वीऑनटेकने महिलांच्या क्रमवारीतील आपले अग्रस्थान कायम ठेवले.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!