Just another WordPress site

दहावी-बारावीत विद्यार्थी नापास झाल्यास गुरुजींची पगारवाढ बंद; विजयकुमार गावीत यांचा इशारा

नंदुरबार : देशातील व राज्यातील आदिवासी भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी भारत सरकारचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय देशात सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहे. मात्र, तरीही निकालाच्या टक्केवारीत आश्रमशाळा मागे असल्याचे चित्र आहे. दरम्यान, इयत्ता दहावी, बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल, त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्यात येईल असा इशारा आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसंदर्भात राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijayakumar Gavit) यांनी दिले आहेत. (Salary increase stopped if students fail in class 10th, 12th; Tribal Development Minister’s warning to ashram school teachers)

राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांचा दर्जा सुधारावा. यासाठी सध्या आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या बांधकामासाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आला आहे. यातून अनेक प्रकल्पांतील आश्रमशाळा आणि वसतिगृहांचा कायापालट होत असतांना दुसरीकडे आश्रमशाळांमधील शैक्षणिक दर्जाबाबत चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता याबाबत कठोर पावले उचलले जात आहेत. त्यामुळेच यापुढे आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये दहावी, बारावी परीक्षेत ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल, त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्यात येईल, असा निर्णय विभागाने घेतल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले.

आश्रमशाळेतील मुले पहिलीपासून दहावीपर्यंत आश्रमशाळेतच राहत असताना ते नापास होतातच कसे, असा प्रश्न उपस्थित करून या मुलांना कमीतकमी ७५ टक्के गुण मिळायला हवेत, असे गावित म्हणाले. त्याचबरोबर आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तीमाही परीक्षांसह शिक्षकांचीही तिमाही चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या शैक्षणिक दर्जाचे मूल्यमापन होणार असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले.

अनुदानाची संबंधितांकडून वसूली
विभागाच्या अखत्यारीतील अनुदानित आणि नामांकित शाळांमध्ये नववीत जितकी मुले असल्याचे दाखवू अनुदान घेतले जाते. प्रत्यक्षात दहावीत तितकी मुले परीक्षेला बसतच नसल्याचे निदर्शनास आले आहे. नववीतील संख्येप्रमाणे मुले जर दहावीच्या परीक्षेला बसली नाहीत, तर तफावतीतील दहा वर्षांच्या अनुदानाची रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाईल, असे डॉ. गावित यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!