Just another WordPress site

अजित पवार कायम उपमुख्यमंत्री व्हायला तयार, मला त्यांची दया येते; कोश्यारींचा खोचक टोला

Bhagat Singh Koshyari On Ajit Pawar : गेल्या विधानसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीच्या (MVA) निशाण्यावर असलेले आणि राजकीय घडामोडींमध्ये कायम चर्चेत असलेले माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर खोचक टीका केली आहे. अजित पवार हे एक वेगळे व्यक्तिमत्व आहे. उपमुख्यमंत्री होण्यासाठी ते नेहमीच तयार असतात. यामुळे मला कधी कधी त्याची दया येते, असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवरील त्यांच्या वर्चस्वाचे कौतुकही केले.

एका हिंदी न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत भगतसिंग कोश्यारी यांनी शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले की, देशातील प्रत्येकजण शरद पवारांचा आदर करतो, एवढे ते मोठे आहेत. आम्ही राजकीय मुद्द्यांवर एकमेकांवर टीका करत असलो तरी शरद पवारांबद्दल मला नेहमीच आदर वाटत आला आहे. शरद पवार यांचा दोनदा डिलीट पदवी देऊन सत्कार करण्याचा मान मला मिळाला, अशी आठवणही कोश्यारी यांनी सांगितली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून भाजपशी हातमिळवणी करणारे अजित पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याबाबत भगतसिंग कोश्यारी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवारांना खोचक टोला हाणला. ते म्हणाले, अजित पवार हे महाराष्ट्रातील एक हुशार राजकारणी आहेत. त्यांच्या विचारामध्ये स्पष्टता आहे. आपल्या राज्यातही असाच एक मोठा नेता आहे. तो कितीही वेळा पराभूत झाला तरी हार मानत नाहीत. त्यानुसार अजित पवार यांना उपमुख्यमंत्री होण्यासाठी कितीही वेळा सांगितले तरी ते त्यासाठी नेहमीच तयार असतात. कधीकधी मला त्यांची दया येते, असे भगतसिंग कोश्यारी उपहासात्मक हसत म्हणाले.

यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वगुणांचेही कौतुक केले. अजित पवार हे चांगले आणि हुशार व्यक्ती आहेत. त्याचा मास बेस प्रचंड मोठा आहे. त्यांच्याकडे चांगला जनाधार आहे. संघटनेवर मोठी पकड आहे. बहुतांश आमदार त्यांच्या बाजूने आहेत. अजित यांचे संघटन कौशल्य, नेतृत्व आणि पक्षातील स्थान मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!