Just another WordPress site

मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांची तुफाण मारामारी, उपटल्या झिंज्या, जोरदार मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणं काही सोपं काम नाही. कारण ट्रेनमध्ये इतकी प्रचंड गर्दी असते जणू विशेष प्रकारचं ट्रेनिंग घेतल्याशिवाय माणूस चढूच शकणार नाही. त्यात पुन्हा बसण्यासाठी जागा मिळवायची म्हणजे वेगळाच संघर्ष. या दरम्यान अनेकदा भांडणं देखील होतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन महिला भांडण सुरू करतात आणि त्यांच्या तिसरी महिलाही सहभागी होते.

 

जागेवरून भांडणे

मुंबई लोकल मधील बहुतांश भांडणे ही बसण्याच्या जागेवरूनच होत असतात. या व्हिडिओत दिसणारी घटना ही हार्बर मार्गावरील असल्याचे समजते. तुर्भे रेल्वे स्थानकावर लोकल आली असता, बसण्याच्या जागेवरून अचानक दोन महिलांमध्ये वाद सुरू झाला. त्यातील एका महिलेची बाजू दुसऱ्या महिलेनेही उचलून धरली. त्यामुळे एक महिला विरुद्ध दोन महिला असे चित्र डब्यात निर्माण झाले. बसण्याच्या जागेवरून अगोदर या महिलांनी एकमेकींना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर एकमेकींचे केस पकडून ओढायलाही सुरुवात केली. काही वेळाने तर या महिला एकमेकींच्या कानशीलात लगावत असल्याचेही दिसून आले. डब्यातील इतर महिला या भांडणाचा आनंद घेत असल्याचेही काही जणींच्या चेहऱ्यावरून दिसून आले.

 

रोजचीच भांडणे

मुंबई लोकलमध्ये रोज कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद आणि भांडणे ही होतच असतात. अनेकदा केवळ शाब्दिक वाद होतात तर कधी प्रत्यक्ष हाणामारीलाही सुरुवात होते. या व्हिडिओत अत्यंत आक्रमक होऊन एकमेकींच्या अंगावर धावून जाणाऱ्या महिला दिसतात. ज्याप्रकारे त्या एकमेकींचे केस ओढत आहेत आणि एकमेकींना मारण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यावरून त्या किती रागावल्या आहेत, हे स्पष्टपणे दिसून येते. मुंबईतील धकाधकीच्या जीवनात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि ताणतणावांचा सामना करताना कशी मानसिक दमछाक होते आणि त्याचा राग अशा घटनांमधून बाहेर पडतो, हेच या व्हिडिओतून दिसून येत आहे.

 

व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात घडलेली ही घटना कोणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून अनेकजण त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत. मुंबई लोकलमधील गर्दी आणि त्यावरून होणारे वाद या गोष्टी मुंबईकरांसाठी नव्या नसल्या, तरी या व्हिडिओच्या माध्यमातून खरे मुंबई लाइफ काय असते, याची चुणूक मुंबईबाहेरील युजर्सना मिळते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!