Just another WordPress site

World’s Longest Nails : काय सांगता! महिलेने २५ वर्ष नखं कापली नाही, आता नखं ४२ फूट लांब वाढली, गिनीज बुकात झाली नोंद

कोणताही विश्वविक्रम करणं सोपं नसते. विश्वविक्रम करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. मात्र, विश्वविक्रम हा असा विक्रम असतो, जो करण्यासाठी जगभरातील लोक काहीही करण्यासाठी तयार असतात. कधीकधी काही विक्रम फार वेगळे असतात. अशीच एक अनोखी गोष्ट करून एका अमेरिकेतील महिलेने अनोखा विश्वविक्रम केला. या महिलेच्या नावे जगातील सर्वात लांब नखांचा विक्रम आहे. अलिकडेच या महिलेचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं.

महत्वाच्या बाबी

१. सर्वात लांब नखांचा विश्वविक्रम अमेरिकेच्या महिलेचा
२. डायनाने तब्बल २५ वर्षात एकदाही कापली नाही नखे
३. डायना आर्मस्ट्रॉंगच्या नखांची लांबी ४२ फुट १० इंच
४. डायनाने दिवंगत मुलीच्या आठवणीत वाढवली नखे

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपल्याला ते कापावे लागतात. महिलांसाठी  तर नखं हे त्यांच्या सौंदर्याशी देखील निगडीत असतात. त्यामुळं महिला नखांची विशेष काळजा घेतांना दिसतात. केस वाढवून वेगवेगळ्या हेअर स्टाईल साकरणं हे बऱ्याच महिलांना आवडतं. तसंच नखं वाढवत त्यावर रंगीबेरंगी नेलपेंट्स लावणे, नेल आर्ट किंवा नेल पिअर्सिंग सारख्या  फॅशन महिला करताना दिसतात. सौंदर्याच्या दृष्टिकोनातून नखं वाढवण्याचा ट्रेंडही वाढला. मात्र, अमेरिकेतील एका महिलेने नखे वाढवून जागतिक रेकॉर्ड केलंय. तिच्या नखांची एकूण लांबी ४२ फुट १० इंच असून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये तिच्या या विक्रमाची नोंद झाली. अमेरिकेच्या मिनीसोटा मध्ये राहणाऱ्या या ६३ वर्षीय महिलेचं नाव डायना आर्मस्ट्रॉंग आहे. या वर्षी मार्च मध्ये तिने हे रेकॉर्ड केले. १९९७ मध्ये तिने शेवटची नखे कापली होती. त्यानंतर गेल्या २५ वर्षात डायनाने एकदाही नखे कापली नाहीत. आता सुरु आहे २०२२. म्हणजे सलग २५ वर्ष नखं न कापता या महिलेने  आपली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली.  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, डायना आर्मस्ट्रॉंगच्या नावावर सगळ्यात जास्त लांब नखे असल्याचा विक्रम आहे.

डायनाचं नखं वाढवण्याचं कारण विश्वविक्रम करणं नव्हतं. तर डायनाने  मुलीची आठवण म्हणून नखं वाढवण्यास सुरुवात केली होती. डायनाची मुलगी १६ वर्षांची असताना तिचा दम्यामुळे मृत्यू झाला. डायनाची मुलगी हयात असताना डायनाची नखं कापून त्यांना नेलपेंट लावायची. तिचा मृत्यू होण्याची आदल्या दिवशीही तिने डायनाच्या नखांना नेलपेंट लावली होती. यामुळे डायनाने दिवंगत मुलीच्या आठवणीत नखं वाढवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आपपर्यंत एकदाही डायनाने आपली नखं कापली नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!