Just another WordPress site

Railway : ‘रेल्वे स्टेशन’ला भारतीय भाषेत काय म्हणतात? इथं दाखवा तुमची हुशारी

‘झुक झुक झुक झुक अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी… ‘ हे गाण आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय. रेल्वेची आणि ही आपली पहिली ओळख होती ती या गाण्यातून. नंतर आपण मोठं होत जातो तसं अनेक टप्प्यांवर, अनेक प्रसंगांमध्ये आपण रेल्वेने प्रवास करतो.  रेल्वे स्टेशनवरूनच आपण ट्रेन पकडतो. मात्र,  तुम्ही कधी विचार केला आहे का,  की रेल्वे स्टेशन हा इंग्रजी शब्द असून रेल्वे आणि रेल्वे स्टेशनला भारतीय भाषेत काय म्हणतात? याच विषयी जाणून घेऊ.


महत्वाच्या बाबी 

१. भारतात हिंदी भाषेचा वापर सर्वाधिक होतो

२. बऱ्याचदा बोलतांना आपण इंग्रजी शब्द वापरतो

३. ट्रेनला भारतीय भाषेत ‘लोहपथ गामिनी’ म्हणतात

४. रेल्वे स्टेशनला लोहपथ गामिनी विराम बिंदू म्हणतात

 

खंरतर भारतात हिंदी भाषेचा वापर सर्वाधिक होतो. देशातील बहुतांश लोकांना हिंदी भाषा समजते. मात्र, आता या हिंदी भाषेत अनेक भाषांतील शब्दांचे मिश्रण झाले. जसं, इंग्रजी, फारशी, अरबी. हे हिंदी शब्द नाहीत, मात्र, लोक या शब्दांचा सर्रास वापर करतात. उदाहरणच द्यायचे, तर असाच एक शब्द आहे रेल्वे. आपण रेल्वे अगदी सहजपणे बोलून जातो. मात्र,  हा इंग्रजी शब्द आहे. असे अनेक शब्द आहेत, जे हिंदी नसले तरी प्रचलित आहेत.  खरंतर भारतीय रेल्वे जगातील चौथी आणि आशियामधील दुसरी सर्वात मोठी रेल्वे आहे. देशातील कोट्यावधी लोक दररोज रेल्वेनं प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. असं असतांना आपण भारतीय लोक रेल्वेसाठी अजूनही रेल्वे किंवा ट्रेन हेच शब्द वापरतो.   आपण कधीच रेल्वेला भारतीय भाषेत काय म्हणतात, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. काही लोकांना तर ट्रेन आणि रेल्वे स्टेशन ही नावे भारतीयच वाटतात.  शुद्ध हिंदी भाषेत रेल्वेला असा शब्द आहे जो सहसा ऐकतानाही आपल्या भुवया उंचावतील. ट्रेनला भारतीय भाषेत ‘लोहपथ गामिनी’ म्हणतात. सोप्या शब्दात लोक ट्रेनला रेलगाडी किंवा आगगाडी असंही म्हणतात. लोहपथ गामिनी या शब्दाचे सविस्तर वर्णन केलं तर आपल्या लक्षात येईल की,  हे नाव इतके अवघड का आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास लोहपथ याचा अर्थ होता लोखंडाचा रास्ता आणि गामिनी म्हणजे अनुसरण करणारी किंवा चालणारी. या सर्व शब्दांना जोडून ट्रेनला भारतीय भाषेत ‘लोहपथ गामिनी’ असं म्हटल्या जातं. तर, रेल्वे स्टेशनला भारतीय भाषेत ‘लोहपथ गामिनी विराम बिंदू’ असं म्हटल्या जातं.  ही नावे ऐकल्यानंतर अनेकजण थक्क होतील. त्यामुळे लोक ही कठीण नावे उच्चारण्यापेक्षा ट्रेन, रेल्वे स्टेशन म्हणणे पसंत करतात. मात्र आपण भारतीय भाषेचा देखील वापर करायला हवा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!