Just another WordPress site

३५ वर्षे त्यांना दिले, मला पाच वर्षे द्या;  डॉ. सुजय विखेंची संगमनेरात हाक

Ahmednagar Politics : जोर्वे गावाने आजपर्यत केवळ विकासाच्या कामावर विखे परिवाराला साथ दिली. विकास काय असतो हे ना. विखे पाटील यांनी दाखवून दिले आहे. आता तालुक्यातील अन्य गावात युवकांच्या सहकार्याने विकासाचे परिवर्तन असेच घडवायचे आहे. तालुक्याने ३५ वर्ष त्यांना दिली, ५ वर्ष माझ्यासारख्या युवकाला द्या, असे आवाहन डॉ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) यांनी केले.

Hyderabad Gazette : नोंदी आहेत, तर आरक्षण द्या ना; विश्वास पाटील 

जोर्वे येथे महिला बचत गटांना जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पिठाच्या गिरणीचे वितरण डॉ. विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ करण्यात आला. गावात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच गावातील भजनी मंडळांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

Hyderabad Gazette : निजाम राजवटीत 1881 मध्ये 16 लाख 58 हजार कुणबी, विश्वास पाटलांचे संशोधन 

डॉ. विखे म्हणाले, या वर्षात ना. विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिलेला निधी पाहता यापूर्वी या भागातून आमदार निवडून कसे गेले? असा प्रश्न पडतो. शिर्डी विधानसभा मतदारसंघात जोर्वे गाव समाविष्ट झाल्यानंतर प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा लागला. कोव्हीड संकटात येथील लोकप्रतिनीधी कुठे होते? गेली अनेक वर्षे सर्व सत्तास्थान त्यांच्या कुटुंबांच्या ताब्यात आहेत. तेच ठेकेदार आणि तेच पदाधिकारी, अनेक वर्षे पहायला मिळतात. सहकारी संस्था नातेवाईकांच्या ताब्यात आहेत. आमच्यावर दहशतीचा आरोप करता ? येथे सामान्य माणसांच्या जमिनी बळकावण्याच्या घटना घडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!