Just another WordPress site

मुख्यमंत्रिपदावरून ‘मविआ’त धुसफूस! काँग्रेस खासदाराकडून, पटोलेंच्या नावाची झाली घोषणा

 

Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभेची अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) धुसफूस सुरू झाली आहे. राज्यातील काही सर्वेक्षणांचे निष्कर्ष समोर आले आहेत. त्यात विरोधी पक्षांना सत्ताधारी आघाडीपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता दिसून आली आहे. त्यामुळे आघाडीतील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांनी मुख्यमंत्रिपदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुलनेने गप्प असून या विषयावर फारसे बोलताना दिसत नाही.

चीनमध्ये कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले, १ जानेवारीपासून नवा नियम होणार लागू 

काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल, असे अनेकदा जाहीर केले आहे. राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी स्पष्ट केले आहे की शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी महायुतीचे सरकार हटविण्याला त्यांचे प्राधान्य आहे याकडे काँग्रेसच्या एका नेत्याने लक्ष वेधले.

एकीकडे असे सगळे सांगितले जात असताना दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी काँग्रेस हा महाविकास आघाडीतील मोठा भाऊ आहे, असा दावा करून खळबळ उडवून दिली. त्याचवेळी काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा खासदार प्रशांत पडोळे यांनी एक पाऊल पुढे टाकत विधानसभा निवडणुकीनंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना राज्याचे पुढील मुख्यमंत्री घोषित करून टाकले आहे.

त्याला उत्तर देताना ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते (परिषद) अंबादास दानवे म्हणाले की, पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील यात प्रश्नच नाही आणि हीच राज्यातील जनतेची इच्छा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!