Just another WordPress site

How was cheese invented? : दररोज आहारात असणाऱ्या पनीरचा इतिहास तरी काय? कोणी लावला पनीरचा शोध?

भारतीय मेजवानीमध्ये सर्वात प्रसिद्ध पदार्थ कोणता आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? साहजिकच, त्याचं उत्तर आहे पनीर! खासकरून तुम्ही शाकाहारी असाल आणि तुमच्याकडे कोणता पर्याय नसेल तर… पनीर  हाच पर्याय तुम्ही निवडाल.  पनीर हा शाकाहारी लोकांना खूप प्रिय आहे. कुठलाही सण असो किंवा लग्न सोहळा पनीरशिवाय पूर्ण होत नाही. मात्र, पनीरचा इतिहास काय? पनीरच्या शोधाची रंजक कहाणी काय? याच विषयी जाणून घेऊ.   



महत्वाच्या बाबी 

१. पारंपरिक पदार्थामध्ये पनीरचा समावेश असतो

२. पनीर पर्शियन शब्द असून तुर्कीत Peynir म्हणतात 

३. पनीरचा शोध १७ व्या शतकात बंगालमध्ये लागला

४. चरकसंहिता या आयुर्वेदिक ग्रंथातही पनीरचा उल्लेख


पनीर हा सामान्यपणे वापरला जाणार पदार्थ आहे. भारताच्या पारंपरिक पदार्थामध्ये पनीरचा समावेश असतोच. पनीर हा पर्शियन शब्द आहे. इतर देशांमध्ये पनीर या शब्दाचं स्पेलिंग बदललं जातं. पण, उच्चार सारखाच असते.  तुर्कीमध्ये Peynir, तर अमेरिकेमध्ये ‘Panir’ असंही म्हंटलं जातं. इतिहासकार सांगतात की, पनीरचा शोध हा १७ व्या शतकात भारतातील बंगालमध्ये लागला. दुधात सायट्रीक अॅसिडीची प्रक्रिया करुन पनीर तयार करण्याचा शोध हा त्यावेळी पोर्तुगीजांनी लावला. त्यानंतर बंगालमध्ये दूध फाडून पनीर बनवण्याची सुरुवात झाली. यामुळं पनीरचा शोध भारतात लागला आणि भारतीयांना पनीर बनविण्याची कला पोर्तुगीजांनी शिकवली असं म्हणता येईल. भारतातील इसवी सन पूर्व सातव्या-आठव्या शतकात लिहिलेल्या ‘चरकसंहिता’ या आयुर्वेदिक ग्रंथातही पनीरचा उल्लेख असल्याचं म्हटल्या गेलंय. या ग्रंथाच्या शेवटच्या श्लोकात ‘तक्राकुर्चिका’ वर्णन केलं गेलं. त्यात  दूध उकळताना त्यात काही ‘द्रव’ टाकून ते फुटते, असं सांगिलतं. या प्रक्रियेला ‘तक्राकुर्चिका’ असं म्हणतात. याचा अर्थ ‘तक्राकुर्चिका’ म्हणजे पनीर असा आहे, असं इतिहासकारांचं म्हणंणं आहे. पनीरच्या निर्मितीची दुसरी कथादेखील सांगितली जाते की, अफगाणिस्तान आणि  इराणी प्रवासी भारतात आले. त्यांनी पहिल्यांदा दक्षिण आशियाच्या उत्तर-पश्चिम भागात पनीरचा पदार्थ आणला. दरम्यान, आता पनीरमध्ये अनेक प्रकार पहायला मिळतात.  पनीर हा भरपूर प्रथिनं असणारा पदार्थ आहे. पनीर स्नायू आणि हाडे बळकट करतो. पनीरमध्ये फायबरचं प्रमाण असल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. तसेच रक्तातील साखर आणि वजन कमी करण्यासाठी पनीर उपयुक्त पदार्थ आहे. त्यामुळे पनीर खा! तंदुरुस्त रहा!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!