Just another WordPress site

Why is the color of emoji yellow? : तुम्हाला माहित आहे का, Emoji चा रंग पिवळाच का असतो?

सध्या फोनवर कॉलिंगसोबत चॅटिंगकडेही कल वाढताना दिसतो. चॅटिंगमध्ये आपल्या भावना, मतं व्यक्त करण्यासाठी आता बहुतांश लोक शब्दांऐवजी इमोजीचा प्राधान्याने वापर करताना दिसतात. मात्र, या इमोजीचा रंग पिवळाच का असतो, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? चला याच विषयी जाणून घेऊ. 



आज तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोनमुळे संपूर्ण जग एकमेकांजवळ आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि मॅसेंजरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या जात आहे. आनंद, दु:ख, उत्साह आणि राग व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर केला जातो.या इमोजींचा आपण सर्रास वापर करतो. इमोजी जपानमधील  डिझाईनर शिगेताका कुरिता यांनी वयाच्या २५ व्या वर्षी प्रथम इमोजी साकारला. १९९९ मध्ये त्यांनी इमोजीचे १७६ सेट तयार केले. हे इमोजी लोकांच्या पसंतीस उतरले त्यामुळे न्यूयॉर्कमधील म्युझियम ऑफ आर्ट येथे ते कायमस्वरुपी जतन करण्यात आले.दरम्यान, इमोजीची सुरुवात १९६३ पासून असल्याचे मानले जाते आणि ते प्रथम कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी वापरले गेले. असे म्हटले जाते की एकेकाळी स्टेट म्युच्युअल लाइफ इन्श्युरन्स कंपनीला खूप अडचणी येत होत्या. यावेळी कंपनीने कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी ग्राफिक डिझायनरची नेमणूक केली आणि त्याने एक प्रतीक बनवले. या डिझायनरने एक सिम्बॉल तयार केला. हा सिम्बॉल पिवळ्या रंगाचा होता आणि त्यावर एक छोटीशी स्माइली होती.या सिम्बॉलचा कर्मचाऱ्यांवर परिणाम झाल्याचे दिसून आले आणि तो चर्चेत आला. पहिल्यांदा जेव्हा इमोजी तयार केला गेला तेव्हापासून आजपर्यंत त्याचा रंग पिवळाच आहे. हॅप्पी फेससाठी पूर्वी याचा वापर केला जात असे. मात्र आता अनेक प्रकारचे इमोजी आले आहेत. यापूर्वी केवळ आनंद दर्शवण्यासाठी इमोजीचा वापर केला जात असे आणि त्यावर व्यक्तीच्या चेहऱ्याचे भाव असत. इमोजीच्या पिवळ्या रंगाविषयी अजून सविस्तर पाहिलं तर यामागे अनेक तर्क  सांगितले जातात.यापैकी एक तर्क असा की चेहऱ्याचा रंग पिवळाच निवडला गेला कारण तो वर्णभेदा पेक्षा निराळा आहे. तो गोरा किंवा काळा या रंगापेक्षा वेगळा आहे. पिवळा रंग हा आनंदाशी निगडीत आहे. याचा संबंध सूर्याशी असून, तो आनंदाचे प्रतीक मानला जातो. पिवळा रंग आकर्षक असून तो ऊर्जादायी देखील आहे. त्यामुळे इमोजीत पिवळ्या रंगाचा वापर केला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!