Just another WordPress site

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले नेते अनिल परब हे अडचणीत आले आहेत. दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी परब आणि इतर काही जणांविरोधात आयपीसी कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात गंभीर आरोप करत दापोली येथील रिसॉर्ट अनधिकृत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आता दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रुपल दिघे यांनी याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अनिल परब तसंच अन्य दोघांविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून किरीट सोमय्या हे अनिल परब यांच्याविरोधात रान उठवत आहेत. हे रिसॉर्ट परब यांच्या मालकीचे असून त्यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तसंच, रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा वापरण्यात आला असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता.
दरम्यान, साई रिसॉर्ट जमीनदोस्त करण्यात यावं यासाठी किरीट सोमय्यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. या रिसॉर्टचे पाडकाम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. त्याआधीच अनिल परब यांच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!