Just another WordPress site

Aircraft Colour : प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानाचा रंग पांढरा का असतो? नेमकं कारण काय? वाचा

आपण आकाशात अनेकदा विमान पाहतो. लहानपणी आपल्याला याचे विशेष कौतुक वाटायचं. विमानातून एकदा तरी प्रवास करावा, असं तेव्हा तुम्हा प्रत्येकाला वाटलं असेल. नंतर तुमच्यापैकी अनेकांनी विमानात प्रवासही केला असेल. प्रवास केला नसेल तरी कमीत कमी विमान तरी पाहिलं असेल. तुम्ही पाहिलं असेल की, जास्तीत जास्त विमानांचं रंग पांढराच असतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, विमानांचं रंग पांढराच का असतो? याच विषयी जाणून घेऊ.


विमानाचा रंग पांढरा असण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे, पांढरा रंग विमानाला सूर्याच्या किरणांपासून वाचवतो. थोडक्यात काय तर, पांढरा रंग उष्णतेला परावर्तीत करतो. धावपट्टीपासून आकाशापर्यंत विमाने नेहमी उन्हात असतात. धावपट्टीवर असो किंवा आकाशात, सूर्याची किरणे नेहमी त्यांच्यावर थेट पडतात. सूर्याला इन्फ्रारेड किरण असल्याने, विमानामध्ये तीव्र उष्णता निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत पांढऱ्या रंगामुळे विमान गरम होण्यापासून वाचवले जाते. पांढरा रंग सूर्याच्या ९९ टक्के किरणांना परावर्तीत करतो.  त्यामुळं कोणत्याही तापमानात विमान थंड रहावे यासाठी विमानाला पांढरा रंग असतो.  विमानाचे आयुष्य वाढवण्यासाठीही पाढरा रंग  उपयुक्त ठरतो. दुसरं म्हणजे, विमानाचा रंग पांढरा असल्याने कोणत्याही प्रकारचा क्रॅक किंवा भेग विमानावर पडल्यास ती भेग अगदी सहजपणे दिसून येते. जर विमानाचा रंग पांढऱ्या ऐवजी दुसरा असेल तर भेगा किंवा क्रॅक विमान चालकाच्या लक्षात येणार नाहीत. त्यामुळं पांढरा रंग विमानाच्या मेंटेनन्स आणि निरीक्षणासाठी फायदेशीर ठरतो. विमानाचा रंग पांढरा ठेवण्याचं आणखी एक मोठं कारण आहे. ते म्हणजे,  विमानाला पांढरा रंग देण्यासाठी साधारणत: ३ लाख ते १ कोटी रुपये इतका खर्च येतो. हेच जर वेगळा रंग द्यायचा म्हटल्यास ही किंमत आणखी वाढेल. जर धातूचे विमान काळ्या रंगाने रंगवले गेले असेल तर भरपूर पेंट खर्च होईल. तसंच असं केल्यानं विमानाचे वजन देखील वाढेल. बोईंग ७४७ सारखे विमान रंगविण्यासाठी कित्येक किलो रंग लागेल आणि नंतर त्याचे वजन सुमारे २५० किलोग्रॅमपर्यंत वाढेल. विमान कंपन्यांना असं वाटलं की,  विमानाचा रंग जितका गडद असेल, तितके त्याचे वजन वाढेल.  इतर सर्व रंगांच्या तुलनेत पांढऱ्या रंगांचं वजन फार कमी असतं. पांढरा रंग लावल्याने विमानाचा भार जास्त वाढत नाही. जे आकाशात उडण्यासाठी फार गरजेचं आहे. त्यामुळं विमानाचा रंग हा पांढरा असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!