Just another WordPress site

तरुणांनी आपले विचार निर्भीडपणे मांडले पाहिजे – शेतकरी नेते दशरथ सावंत यांचे प्रतिपादन

अहमदनगर : आमच्या जुन्या पिढीच्या माणसांपेक्षा आजच्या तरुणांची आकलन क्षमता जास्त आहे. आताच्या परिस्थितीचे त्यांनी गांभीर्याने अवलोकन केले पाहिजे. आपल्याला स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली. तरी काहीतरी बिघडलंय असं वाटतच राहतंय. तरुणांनी हे दुरुस्त करावं. आताच्या राजकारणात नवा, सशक्त पर्याय देण्याची गरज आहे. आजच्या तरुणांना हे आव्हान पेलावच लागेल, असे विचार शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी व्यक्त केले. ते न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये कॉम्रेड एकनाथराव भागवत यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित राज्यस्तरीय वाद विवाद व वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावर्षी स्पर्धेचे हे चौतिसावे वर्ष आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र दरेसाहेब यांनीही अध्यक्षीय भाषणात स्पर्धकांनी आपले विचार परखडपणे मांडावे. चांगलं काही होत असेल तर त्याचे कौतुक झाले पाहिजे, परंतु चांगले काय वाईट काय हे तरुणांनी विचारपूर्वक ठरवावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी अ.जि.म.वि.प्र.समाज संस्थेच्या कार्यकारणी सदस्या मा. निर्मलाताई काटे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे. तसेच शेवगाव,पाथर्डी, नगर येथील भागवतांवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते, भागवत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बी.एच. झावरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश निमसे यांनी तर आभार डॉ. डी. बी. कोल्हे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कलाशाखेचे उपप्राचार्य डॉ. बी. बी. सागडे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. एस. बी. कळमकर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. ए. ई. आठरे हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!