Just another WordPress site

Nap Box : ऐकावं ते नवलंच! कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये झोपण्यासाठी करण्यात आली नॅप बॉक्सेसची निर्मिती!

तुम्हाला ऑफिसमध्ये झोप येते का? येतंच असेल. दुपारच्या ब्रेकमध्ये जेवल्यानंतर काय मस्त डुलकी लागते. मात्र, तरीही कर्मचाऱ्यांना झोपता येत नाही.. त्यामुळं झोप अपूर्ण राहते. माणसाला नेहमी ताजंतवाणं राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. त्यामुळं आपल्या व्यस्त शेड्यूलमधून १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅप  घेण्याची आवश्यकता आहे. मात्र,ऑफिसमध्ये पॉवर नॅप घ्यायचा कसा? हा खरा प्रश्न आहे. मात्र आता जपानच्या एका कंपनीनं यावर उपाय शोधला. नेमका हा शोध आहे तरी काय ? याच विषयी जाणून घेऊ.


महत्वाच्या बाबी 

१. नेहमी ताजंतवाणं राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक

२. जपानमध्ये डुलकी काढण्यासाठी नॅप बॉक्स बनवले

३. कर्मचाऱ्यांना आता ऑफिसमध्येच घेता येणार डुलकी

४. इटोकी आणि कोयोजू गोहन यांनी बनवले नॅप बॉक्स

हल्ली कशाच्या सुविधा येतील हे काही सांगता येत नाही. चक्क आत्महत्येसाठीचेही बॉक्स जगाच्या पाठीवर तयार झालेले असतांना आता जपानमध्ये डुलकी काढण्यासाठी ‘नॅप बॉक्स’ बनवण्यात आले. कामाच्या ठिकाणी घटकाभर डुलकी काढून फ्रेश होण्यासाठीचे हे नॅप बॉक्स आहेत. कारण, सध्याच्या धावपळीच्या जीवनात माणसाला घटकाभर विश्रांती घेणंही दुरापास्त झालंय. अनेक कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांवर तर कामाचा अतिरिक्त ताण असतोच, शिवाय, काम अधिक चांगलं व्हावं यासाठीचा दबावही असतो. कामाच्या या रहाटगाडग्यात माणूस नीट झोपूही शकत नाही. हीच समस्या लक्षात घेऊन, जपानच्याच इटोकी आणि कोयोजू गोहन यांनी यावर उपाय शोधला. या दोघांनी देशात एक हेल्दी ऑफिस कल्चर आणण्यासाठी एक व्हर्टिकल म्हणजेच उभा नॅप बॉक्स बनवला. जेणेकरून देशात आरोग्यदायी कार्यालयीन संस्कृती आणण्यात मदत होईल. टोकियोत राहणारा फर्निचर तज्ज्ञ इटोकी आणि होक्काइडोचा प्लायवूड पुरवठादार असलेला कोयोजू गोहन हे एका कार्यक्रमात भेटले आणि दोघांनी ही संकल्पना साकार करण्याचं ठरवलं. त्यांनी सांगितले की,  जपानमधील कर्मचार्‍यांना जास्त वेळ काम करावं लागणं ही एक सर्वसामान्य मात्र, मोठी समस्या आहे. जपानमध्ये बरेच लोक असे आहेत की, जे स्वत: ला काही काळ बाथरूममध्ये बंद करून घेतात आणि पॉवर नॅप घेतात. त्यामुळं कर्मचाऱ्यांना घटकाभर विश्रांती घेता यावी, यासाठी हे खास नॅप बॉक्स बनवले. यामध्ये मोठ्या शिफ्टमधले  कर्मचारी झोपू शकतात; मात्र यासाठी अट एवढीच आहे, की त्यांना या बॉक्समध्ये आडवं न होता उभंच राहून झोपावं लागेल. कारण,  नॅप बॉक्सचं जे डिझाइन समोर आलंय, त्यानुसार कर्मचारी नॅप बॉक्समध्ये सरळ उभं राहून बॉक्समध्ये डुलकी घेऊ शकतील. डुलकी घेताना बॉक्समधली व्यक्ती पडणार नाही, अशा प्रकारे रचना ही केली गेलीये. हे विचित्र स्लीप स्टेशन एखाद्या स्लिम वॉटर हीटरसारखं दिसतं. यात डोकं आणि गुडघ्यांना आधार मिळावा यासाठी खास सुविधा देण्यात आलीये. जेणेकरून व्यक्ती खाली पडणार नाही.

 


 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!