Just another WordPress site

Heavy rain likely in the state from tomorrow : पुन्हा पावसाचं आगमन! राज्यात उद्यापासून चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

मुंबई  : जुलैच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्राला पावसाने झोडपलं. १५ ते २० दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यात मुसळधार पाऊस झाला. सर्वदूर झालेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीही ओढावली होती. दरम्यान, आता राज्यात काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला. गेल्या आठवडाभरात राज्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला होता. अशातच आता उद्यापासून राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला. पुढील चार दिवस मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.  

राज्यात मुंबईसह कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला.  तर आज पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवार आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.  धुवाधार पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली. मोजक्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.  तर उर्वरित ठिकाणी पावसानं उघडीप घेतली होती. मात्र, अशातच आता  मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात  २३ जुलैपासून मुसळधार पाऊस सुरू होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.  त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास घरातच राहावे अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!