Just another WordPress site

प्रियंका गांधींनी शेअर केला प्रयागराजमधील मृतदेहांच्या अवहेलनेचा आणखी एक व्हिडिओ

लखनऊ : उत्तर प्रदेशात कोरोनामुळं मृत्यू झालेल्या मृतांच्या पार्थिवाची अवहेलना झाल्याचे काही व्हिडिओ समोर आले होते. यातील काही मृतदेह थेट गंगेत सोडण्यात आले तर अनेकांचे मृतदेह गंगेच्या घाटावर पुरण्यात आल्याचंही पाहायला मिळालं होतं. या सगळ्या प्रकारामुळं अख्खा देश हादरला होता. मृतदेहांचा हा अपमान असल्याचं सांगत सर्वच स्तरातून या घटनेचा संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, आता प्रियंका गांधींनी प्रयागराजमधील एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत भावनिक पोस्ट केली. जीवंतपणी यांना चांगला उपचार मिळाला नाही. त्यानंतर अनेकांना सन्मानपूर्वक अंत्यविधीही मृत्यूनंतर प्राप्त झाला नाही. सरकारी आकडेवारीतही जागा मिळाली नाही, आणि आता यांची रामनामीही यांच्यापासून हिसकावली जातेय, असं प्रियंका गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. प्रतिमा चांगली करण्यासाठी सरकार पाप करत आहे. हे कसलं स्वच्छता अभियान आहे, असा सवालही प्रियंका गांधींनी उपस्थित करत हा भावनिक व्हिडिओ शेअर केला.

जीते जी ढंग से इलाज नहीं मिला। कितनों को सम्मान से अंतिम संस्कार नहीं मिला। सरकारी आंकड़ों में जगह नहीं मिली। अब कब्रों से रामनामी भी छीनी जा रही है।

छवि चमकाने की चिंता में दुबली होती सरकार पाप करने पर उतारू है। ये कौन सा सफाई अभियान है?

ये अनादर है-मृतक का, धर्म का, मानवता का pic.twitter.com/PHC1fyMKCL

— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 25, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!