Just another WordPress site

कामाची गोष्ट : तुमचे आयुष्यमान भारत कार्ड बनलयं? नसेल तर आताच करा अर्ज, अन् मिळवा मोफत उपचार

देशातील गरीब आणि मागासलेल्या लोकांना आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार एक महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आहे. आजही देशात अशा लोकांची संख्या खूप जास्त आहे, ज्यांना गरिबीमुळे हॉस्पिटलमधील महागड्या उपचारांचा खर्च परवडत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्या काळात आर्थिक विवंचनेमुळे त्यांच्यासमोर संकटांचा डोंगर कोसळतो. देशातील जनतेची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकारनं २०१८ साली प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना सुरू केली होती. या योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि मोदी केअर योजना म्हणूनही ओळखले जाते. देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना (बीपीएलधारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दरम्यान, आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान कार्ड बनवण्याचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आयुष्मान भारत योजनेला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ही घोषणा केली. येत्या काळात दररोज १० लाख आयुष्मान कार्ड बनवण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असे ते म्हणाले. डिजीटल अॅपच्या माध्यमातून अधिकारी लाभार्थ्यांना लवकरात लवकर कार्ड उपलब्ध करून देण्याचे ध्येय पूर्ण करतील.

 

आयुष्मान कार्डसाठी अर्ज कसा करावा

आयुष्मान कार्ड मिळवणे फार अवघड काम नाही, ते अगदी सहज करता येते. यासाठी प्रथम पात्रता तपासावी लागेल. पात्रता तपासल्यानंतर, तुम्हाला तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. येथे तुम्ही संबंधित अधिकाऱ्यामार्फत अर्ज करू शकता.

 

तुम्ही आयुष्मान भारत योजनेत अर्ज करणार असाल तर त्यामुळे तुम्हाला पात्रतेच्या अटींची माहिती हवी. आयुष्मान भारत योजनेत फक्त खालील लोकच अर्ज करू शकतात –
१. कच्चं घर असेल तर
२. कुटुंबात एक अपंग सदस्य असल्यास
३. भूमिहीन व्यक्ती
४. अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असल्यास
५. रोजंदारी कामगार
६. ग्रामीण भागात राहणारे लोक
७. या योजनेत निराधार, आदिवासी इत्यादी लोक अर्ज करू शकता

 

भारत सरकारच्या या योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. योजनेत मागितलेली आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे नसल्यास तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, मोबाईल क्रमांक, कुटुंबातील सर्व सदस्यांचे रहिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

कार्ड डाउनलोड कसं करायचं?

– सर्व प्रथम https://pmjay.gov.in/ वर जा.
– आता येथे लॉगिन करण्यासाठी तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका.
– आता आधार क्रमांक टाकून पुढे जा, पुढील पानावर तुम्हाला तुमच्या अंगठ्याचे ठसे सत्यापित करावे लागतील.
– आता ‘स्वीकृत लाभार्थी’ या पर्यायावर क्लिक करा.
– आता तुम्हाला मंजूर गोल्डन कार्ड्सची यादी दिसेल.
– या यादीमध्ये तुमचे नाव शोधा आणि कन्फर्म प्रिंट पर्यायावर क्लिक करा.
– आता तुम्हाला CSC वॉलेट दिसेल, त्यात तुमचा पासवर्ड टाका.
– आता येथे पिन टाका आणि होम पेजवर या.
– उमेदवाराच्या नावावर कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल.
– येथून तुम्ही तुमचे आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!