Just another WordPress site

पत्नीला कार शिकवताना सुटला ताबा; कारसह पती-पत्नी आणि मुलगी विहिरीत, पत्नी आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथे आज दुपारच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली आहे. सुटी असल्‍याने पत्‍नीला कार शिकविणे सुरू होते. या दरम्‍यान कार शिकवित असताना कारवरील नियंत्रण सुटले अन्‌ कार थेट रस्‍त्‍याच्‍या बाजूला असलेल्‍या विहिरीत जावून कोसळली. यात पत्‍नी आणि मुलीचा मृत्‍यू झाला असून पतीला दवाखान्‍यात दाखल करण्यात आले आहे.
देऊळगावराजा येथील रामनगरमध्ये राहणारे शिक्षक अमोल मुरकुट हे पत्नी स्वाती मुरकुटला कार शिकवत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सिद्धी मुरकुट ही सुद्धा सोबत होती. दरम्यान कार शिकवित असताना चिखली रोडवर जात असताना कार वरील ताबा सुटला. यानंतर कार सरळ ७० फुट खोल विहिरीमध्ये पडली. या झालेल्‍या अपघातात अमोल मुरकुट खिडकीमधून कसेबसे बाहेर आले. मात्र स्वाती मुरकुट व मुलगी सिद्धी मुरकुट यांचा मात्र पाण्यामध्ये मृत्यू झाला आहे. अमोल मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्वाती मुरकुट व सिद्धी यांचा मृतदेह शोधण्यात येत असून अग्निशमन गाडी, पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!