Just another WordPress site

Train । मूर्खपणाचा कळस! दही खरेदी करण्यासाठी ड्रायव्हरने मधेच रोखली ट्रेन, व्हिडिओ व्हायरल

अनेकदा प्रवासादरम्यान तुम्ही पाहिलं असेल की, सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना बस, टॅक्सीचे चालक गाडी थांबवून स्वत:साठी काही वस्तू खरेदी करतात. मात्र रेल्वे चालकाने ट्रेन थांबवली आणि हे कृत्य करायला सुरुवात केली तर? यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र पाकिस्तानात प्रत्यक्षात ही घटना पाहायला मिळाली. 

पहा व्हिडीओ-

Inter-city train driver in Lahore gets suspended after making unscheduled stop to pick up some yoghurt.#pakistan #Railway #ViralVideo pic.twitter.com/n6csvNXksQ

— Naila Tanveer🦋 (@nailatanveer) December 8, 2021

भरधाव वेगात ट्रेन घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरला अचानक दही खाण्याची इच्छा झाली. वाटेत एक गाव दिसल्यावर त्याने मध्येच ट्रेन थांबवली आणि आपल्या सहाय्यकाला दही खरेदी करायला पाठवलं. या घटनेमुळे पाकिस्तानमधील रेल्वेची सुरक्षा चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  होत असून पॅसेंजर ट्रेनचा ड्रायव्हर या अजब कारनाम्यासाठी चर्चेत आला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे विभागावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठली. दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यावर रेल्वे मंत्र्यांनी ट्रेन ड्रायव्हर आणि त्याच्या असिस्टंटला सेवेतून निलंबित केलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!