Just another WordPress site

Sexual Harashment । धक्कादायक! पिंपरीत तरुणीवर तीन मित्रांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार


पिंपरी :  गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये महिलांवर होणाऱ्या शाररिक अत्याचाराच्या सुन्न करणाऱ्या घटना समोर येत आहेेेत. पुण्यासहीत पिंपरी – चिंचवडमध्ये मुलींच्या सुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. वासनेच्या आहारी गेलेल्या नराधमांकडून महिलांवर  लैंगिक अत्याचार होण्याच्या प्रकरणात वाढ होत आहे. त्यातच  पुन्हा एकदा पिंपरीमधून अशीच धक्कादायक बातमी समोर आली.  पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी  परिसरात एका १९ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रथमेश हा पीडित तरुणीचा चांगला मित्र आहे. १५ डिसेंबर रोजी आरोपी प्रथमेश यानं पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावलं होतं. यावेळी संधी साधून आरोपी प्रथमेश याने पीडितेशी जबरदस्ती करत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी आरोपी एवढ्यावरच न थांबता आरोपीनं पीडित तरुणीचे नग्नावस्थेतील फोटो देखील काढले. दरम्यान, संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीच्या मित्रांनी देखील तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणीने पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सगळा गैरप्रकार सांगत फिर्याद दाखल केली. मात्र,  सामूहिक अत्याचाराची टना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.  या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीचा मित्र प्रथमेश उर्फ सनी खैरे याच्यासह स्वराज कदम आणि अन्य एका अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला.  दरम्यान, या घटनेचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!