Just another WordPress site

IPL : आयपीएलमध्ये करोडोंचा लिलाव, मात्र IPL खेळणाऱ्या खेळाडूंना पैसे कसे आणि नेमके किती मिळतात?

आयपीएल ही क्रिकेट विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय लीग आहे. आयपीएलच्या यंदाच्या सीझन २ एप्रिलपासून सुरू होणार आहे. यावेळी स्पर्धेत १० संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यावेळी खेळाडूंचा मेगा लिलाव घेण्यात आला आणि खेळाडूंवर झालेल्या कोट्यवधींच्या रुपयांची उधळण संपूर्ण जगानं पाहिली. मात्र, आता या लीगमध्ये खेळाडूंनी किती पैसे मिळतात?  त्यांचा करार कसा असतो? त्याचा कालावधी किती असतो, याच विषयी घेऊया. 

हायलाईट्स

१. आयपीएल ही क्रिकेट विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय लीग

२. आयपीएलच्या यंदाचा सीझन २ एप्रिलपासून होणार सुरू

३. मानधनाच्याच्या रकमेसाठी तोच खेळाडू दावेदार असतो

४. खेळाडूनं संघ सोडल्यावरही खेळाडूंना मिळतो पैसा


कसे असते मानधनाचे स्वरूप?

खेळाडूवर जितकी बोली लागलेली असते तीच रक्कम त्या खेळाडूचे मानधन ठरते.  त्यानुसार त्यावरील कर आकारला जातो.  मानधनाच्याच्या रकमेसाठी फक्त तोच खेळाडू दावेदार असतो. त्यांना मिळालेल्या बोलीत इतर कुणीही भागीदार नसतं. तसंच हे मानधन  खेळाडूला प्रत्येक सीझननुसार दिलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास समजा,  एखाद्या खेळाडूवर १० कोटींची बोली लागली आणि त्याला खरेदी केलं गेलं असेल तर ती रक्कम एका हंगामासाठीची असते. अशा परिस्थितीत जर एखाद्या खेळाडूचा ३ वर्षांचा करार असेल तर त्याला प्रत्येक हंगामात ३० कोटी मिळतील.


किती सामने खेळावे लागतात?

एखाद्या खेळाडूला संपूर्ण हंगामासाठीचं मानधन देण्यात आलेलं असेल तर तो खेळाडू किती सामने खेळतो याचा काहीच फरक पडत नाही. त्यानं किती सामने खेळले किंवा त्याची निवड झाली याचा काहीच फरक करार झालेल्या खेळाडूंच्या मानधनावर पडत नाही. जर एखाद्या खेळाडूला संपूर्ण  पैसे दिले गेले, तर त्याने किती सामने निवडले किंवा त्याने किती खेळ खेळले हे महत्त्वाचे नसते. समजा एखादा खेळाडू तीन वर्षांच्या करारावर विकत घेतला गेला आणि पुढील हंगामासाठी कायम ठेवला, तर करार वाढवला जातो. आधी दिलेल्या रकमेनुसार हा करार वाढवला जातो. जर एखाद्या संघाला मानधन वाढवून खेळाडूला थांबवायचे असेल, तर रक्कम बदलू शकते. सामान्यतः खेळाडूंना वाढीव पगार देऊन कायम ठेवले जाते.


दुखापतग्रस्त खेळाडूंच्या मानधनाचं काय?

एखाद्या खेळाडूला दुखापतीमुळे सीझन सुरू होण्याआधीच जर स्पर्धेबाहेर जावं लागलं. तर फ्रँचायझीला त्या खेळाडूला मानधन देण्याची गरज भासत नाही. मात्र, एखाद्या खेळाडूला संपूर्ण सीझन ऐवजी काही सामने खेळल्यानंतर दुखापत झाली असेल तर संबंधित खेळाडूला प्रो रेटा आधारावर मानधन द्यावंच लागतं. तसंच खेळाडूंच्या दुखापतीचा खर्च देखील फ्रँयाचझीला करावा लागतो.


खेळाडूनं संघ सोडल्यावरही मिळतो पैसा

एखाद्या खेळाडूला करार संपुष्टात होण्याआधीच स्पर्धेबाहेर व्हायचं असेल तर तो फ्रँचायझीकडे तशी मागणी करू शकतो. करार संपुष्टात येण्याआधीच जर खेळाडू संघ सोडण्याचा निर्णय घेत असेल तरीही फ्रँचायझीला संबंधित खेळाडूला संपूर्ण मानधन द्यावं लागतं.


खेळाडूंना मानधन नेमकं कसं दिलं जातं? 

खास बाब अशी की सर्व फ्रँचायझींना खेळाडूंना एकरकमी पेमेंट द्यावं लागत नाही. खेळाडूंना मानधन कसं दिलं जावं हे फ्रँचायझीकडे नेमकी किती रक्कम शिल्लक आहे आणि स्पॉन्सरशीपचा पैसा कोणत्या पद्धतीनं येत आहे या गोष्टींवर अवलंबून असतं. तर काही फ्रँचायझी खेळाडूंना एक रकमी पेमेंट करतात.


Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!