मुंबई : बारावी उत्तीर्ण असून तुम्हाला अद्याप नोकरी मिळाली नसेल तर ही संधी तुमचं करिअर घडवू शकते. भारतीय रेल्वे क्रीडा कोटा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. गट क या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची आजच शेवटची तारिख आहे.
कोणत्या पदांसाठी भरती?
गट क (RRC/ ER/ Sports Quota)
एकूण जागा – २१
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये नमूद केल्यानुसार खेळांमध्ये खेळाडू म्हणून भाग घेतला असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
भरती शुल्क :
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस साठी – रु. ५००/-
SC/ST/ESM/स्त्रिया/EBC साठी – रु. २५०/-
कागदपत्रं काय?
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 29 सप्टेंबर 2022
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://er.indianrailways.gov.in/index.jsp?lang=0 क्लिक करा.