Just another WordPress site

‘भेडीया’ सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रभासने केले कौतूक, पण नेटकऱ्यांनी केलं भेडीयाला ट्रोल

अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनॉन गेले अनेक दिवस त्यांच्या ‘भेडिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील त्या दोघांचे लूक्स समोर आले होते. तसेच या चित्रपटाच्या टीझरलाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र, ‘भेडिया’चा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांकडून यावर टीका होतेय.

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांचा भेडिया हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर काल रिलीज झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांना चित्रपटाबाबत खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय. याशिवाय या ट्रेलरवर अनेक बॉलिवूड कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या. अभिनेता प्रभासने देखील या चित्रपटाच्या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली. प्रभासने वरुण धवन आणि क्रिती सेनॉन यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. त्याने ट्रेलरवर कमेंट करताना लिहिलं, “ट्रेलर खूपच दमदार आहे. संपूर्ण टीमसह वरुण धवन आणि क्रिती सेनॉन यांना शुभेच्छा.. प्रभासनं या ट्रेलरच कौतून केलं. मात्र, हा ट्रेलर पाहून आता वरुणच्या या चित्रपटाची तुलना नेटकरी ३० वर्षापूर्वी रिलीज झालेल्या राहुल रॉयच्या जुनून या चित्रपटासोबत करत आहेत. तर काही युझर्स या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक करत आहेत.

१९९२ मध्ये रिलीज झालेल्या जुनून या चित्रपटाचं महेश भट्ट यांनी दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात राहुल रॉय, पूजा भट्ट आणि अविनाश वाधवन यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. चित्रपटामध्ये चित्रपटात एक शापित सिंह हा विक्रम चौहान म्हणजेच राहुलला जखमी करतो. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक केआरकेनं देखील भेडिया या चित्रपटाची तुलना जुनून या चित्रपटासोबत केली.
वरुण धवनच्या भेडियाच्या ट्रेलरवर सोशल मीडियावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने ट्वीट करून लिहिले आहे की, भेडियाचा ट्रेलर पाहिल्यानंतर मला राहुल रॉयचा जुनून आठवला, हीच संकल्पना १९९२ मध्ये दिसली होती. केआरकेनं भेडीया हा चित्रपट जुनूनची कॉपी आहे, असं ट्वीटमध्ये लिहिलं.
दरम्यान, ‘भेडीया’ हा चित्रपट २५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात वरुण धवन, क्रिती सेनॉन यांच्यासह दीपक डोबरियाल आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!