निसर्गाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना आला. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून राज्यात मुसळधार पावसानं चांगलचं थैमान घातलं. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सततच्या पावसामुळे खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान तर झालंच. त्यात आता त्यातं शेत शिवारातील वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी होतेय. या प्राण्यांकडून धुडगूस घालून पिके फस्त केली जात असल्याने शेतकरी चिंतेत सापडला.
महत्वाच्या बाबी
१. पावसामुळं खरीप हंगामातील पिकांचे मोठं नुकसान
२. शेत शिवारातील वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी सुरु
३. प्राण्यांकडून पिके फस्त केली जात असल्याने शेतकरी चिंतेत
४. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांची मागणी
जूनच्या अखेरपर्यंत खरिपातील पेरण्या होतील की नाही अशी स्थिती सबंध राज्यात होती. मात्र, जुलैच्या पहिल्या दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस बरसल्यानं बुहतेक पिकं ही पाण्यात गेली. त्यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. त्यात वातावरणामुळे पिकांवर किड-रोगराईचा मोठा प्रादुर्भाव वाढला. गोगलगायीने पिके फस्त करण्याचा धडाका सुरु केल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. अशातच आता सोयाबीन, कपाशी,उडीद, मुग ही पिके ही वाणी, हरीण आणि रानडुकरांनी फस्त केल्याच्या घटना समोर येताहेत. वन्यप्राण्यांचा धुमाकूळ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सततच्या पावसामुळं पिकांच मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. त्याचवेळी अतोनात खर्च करून कष्टाने जगविलेली पिके वन्य प्राण्यांकडून फस्त केली जात आहेत. वन्य प्राण्यांकडून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्यानं शेतकरी संकटात सापडले.. सततच्या मुसळधार पावसानंतर आता कुठं पावसानं उघडीप दिली. त्यामुळं पीक वाढ जोमात होत आहे. मात्र आता वन्यप्राणी कोवळ्या पिकांवर ताव मारत असल्याने, नवीनच संकट शेतकऱ्या समोर उभे राहिलं. रोही, हरीण, रानडुक्कर, वानर यासह अन्य प्राण्यांकडून पिकांचं मोठं नुकसान होतंय. या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त झाला तरच पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. आधी मुसळधार पाऊस, किड रोगराई आणि आता वन्य प्राण्यांचा धुडघूस यामुळं शेतकऱ्यांची संकटाची मालिका ही सुरुच आहे. पावसाने केलेल्या नुकसानीमुळं शेतकरी अगोदरच चिंतेत आहे. त्यात आता वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचा फटका सहन करावा लागतोय. दुबार पेरणी करुन खरिपाबाबत शंका उपस्थित होत असताना आता हे नवे संकट उभे राहिल्यानं शेती करावी कशी? असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. दरम्यान, प्राणी मनसोक्त शेतात फिरून शेतपिकांची नासाडी करतात. मात्र, शेतकरी भीतीपोटी वन्यप्राण्यांच्या नादी लागत नाहीत. वन्यप्राण्यांचा वाढता धुमाकूळ पाहता वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होतेय.